महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

इंग्लंडला जेतेपद मिळवून देणाऱ्या बेलीसच्या मार्गदर्शनात सनरायजर्सचा आयपीएल प्रवास - head coach

ट्रेव्हर बेलीस यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा विजेतेपद मिळवले आहेत. बेलिस यांनी सिडी सिक्सर्स संघाचे प्रशिक्षक असताना संघाने बिग बॅश लीगमध्ये आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

इंग्लंडला जेतेपद मिळवून देणाऱ्या बेलीसच्या मार्गदर्शनात सनरायजर्सचा आयपीएल प्रवास

By

Published : Jul 18, 2019, 8:03 PM IST

हैदराबाद - क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडला पहिला विश्वकरंडक जिंकून देणारे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलीस यांना आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद संघाने प्रशिक्षक पदासाठी नियुक्त केले आहे. हैदराबाद संघ व्यवस्थापनाने आज गुरुवारी प्रसिध्दीपत्रकाव्दारे याची घोषणा केली. यामुळे २०१३ पासून हैदराबाद संघाचे प्रशिक्षक असणाऱ्या टॉम मूडी यांच्या जागी बेलीस घेणार आहेत.

ट्रेव्हर बेलीस यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा विजेतेपद मिळवले आहेत. बेलिस यांनी सिडी सिक्सर्स संघाचे प्रशिक्षक असताना संघाने बिग बॅश लीगमध्ये आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

याकारणाने हैदराबाद संघ व्यवस्थापनाने बेलीस यांची नियुक्ती केली आहे. संघ व्यवस्थापनाने बेलीस यांना प्रशिक्षक करण्याचा निर्णय विचार करुन घेतला असल्याचे, प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, ट्रेव्हर बेलीस हे ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या अॅशेज मालिका झाल्यानंतर इंग्लंडचे प्रशिक्षक पद सोडणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details