सिडनी - भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला आहे. खेळाडूंनी शुक्रवारचा संपूर्ण दिवस सिडनीच्या ऑलम्पिक पार्क हॉटलमध्ये घालवला. यादरम्यान, न्यूज साउथ वेल्स सरकारने खेळाडूंना क्वारंटाइनच्या काळात देखील ट्रेनिंगची परवानगी दिली आहे. यामुळे खेळाडू आज जिम आणि मैदानावर धावण्याचा सराव करताना पाहायला मिळाले.
भारतीय संघाचे खेळाडू जिम आणि मैदानावर धावण्याचा सराव करताना दिसून आले. बीसीसीआयने अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो शेअर केले आहेत. यात पंत सायकलिंग करताना पाहायला मिळाला. तर वरुण चक्रवर्तीच्या जागेवर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेला टी. नटराजन डम्बल्स सोबत कसरत करताना दिसून आला. याशिवाय कसोटी संघाचा शिलेदार चेतेश्वर पुजारा देखील वर्क आउट करताना पाहावयास मिळाला.
बीसीसीआयने हे सर्व फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, विमानातून उतल्यानंतर दोन दिवसांनी, भारतीय संघाने पहिल्यादा सराव केला. फिरकीपटू युजवेंद्र चहल याने देखील कुलदीप यादव सोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत चहलने म्हटल आहे की, भाऊ कुलदीपची भारतीय संघात वापसी.