महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नाणेफेकीसाठी चक्क तीन कर्णधार मैदानात, क्रिकेटमध्ये घडला विचित्र प्रकार - sri lanka vs australia women's cricket match

या नाणेफेकीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून दोन खेळाडू आणि लंकेच्या संघाकडून कर्णधार असे तीन खेळाडू मैदानात आले. हे पाहून तिथे असणारे माजी खेळाडूही आश्चर्यचकित झाले. ऑस्ट्रेलियाच्या संघाची कर्णधार मॅग लेनिंग आणि एलिसा हिली तर, दुसरीकडे श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू नाणेफेकीदरम्यान उपस्थित होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून दोन खेळाडू का ? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर लेनिंगने दिलेले उत्तर भन्नाट होते.

नाणेफेकीसाठी चक्क तीन कर्णधार मैदानात, क्रिकेटमध्ये घडला विचित्र प्रकार

By

Published : Sep 30, 2019, 9:23 AM IST

नवी दिल्ली - क्रिकेटमध्ये नाणेफेकीचा कौल फार महत्वाचा समजला जातो. क्रिकेटमधील खेळपट्टीनुसार नाणेफेक जिंकणे म्हणजे अर्धा सामना जिंकणे असे मानले जाते. सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या महिला संघात क्रिकेटचा सामना झाला. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली.

हेही वाचा -विजय हजारे ट्रॉफी : छत्तीसगडने आंध्र प्रदेशला तर, केरळने हैदराबादला पछाडले

या नाणेफेकीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून दोन खेळाडू आणि लंकेच्या संघाकडून कर्णधार असे तीन खेळाडू मैदानात आले. हे पाहून तिथे असणारे माजी खेळाडूही आश्चर्यचकित झाले. ऑस्ट्रेलियाच्या संघाची कर्णधार मॅग लेनिंग आणि एलिसा हिली तर, दुसरीकडे श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टू नाणेफेकीदरम्यान उपस्थित होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून दोन खेळाडू का ? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर लेनिंगने दिलेले उत्तर भन्नाट होते.

लेनिंग म्हणाली, 'मी नाणेफेकीच्या बाबतीत कमनशिबी ठरले आहे. बऱ्याच नाणेफेकीचा कौल मी हरलेले आहेत. त्यामुळे नाणेफेकीचा कर्णधार म्हणून मी हिलीला निवडले.' आणि हिलीने ही नाणेफेक जिंकलीच, त्याचसोबत तिने आपल्या कर्णधाराचा विश्वासही जिंकला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details