महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यंदाच्या आयपीएलमध्ये मोडले जाऊ शकतात 'हे' ५ विक्रम - आयपीएल २०२० विक्रम न्यूज

आयपीएलचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात होणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच, यंदाही अनेक खेळाडूंना आयपीएलमध्ये विविध विक्रम खुणावत आहेत.

These five big records could be created in ipl 2020
यंदाच्या आयपीएलमध्ये मोडले जाऊ शकतात 'हे' ५ विक्रम

By

Published : Sep 18, 2020, 4:50 PM IST

Updated : Sep 18, 2020, 5:02 PM IST

नवी दिल्ली - जगातील सर्वात रोमांचक आणि प्रसिद्ध लीग असलेल्या आयपीएलला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या लीगचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात होईल. कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा भारतात न खेळवता संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) होत आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नव-नवे विक्रम मोडले आणि बनवले जातात. यंदाचे आयपीएलचे तेरावे पर्वही नव्या आणि होऊ घातलेल्या विक्रमांसाठी सज्ज झाले आहे.

१) विराटच्या टी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावा -

भारतीय क्रिकेट संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला नवा विक्रम खुणावतो आहे. या स्पर्धेत १०० धावा करताच तो टी-२० क्रिकेटमध्ये ९००० धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज असेल. जागतिक विक्रमात तो सातव्या स्थानी असेल. विराटपूर्वी, ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, ब्रेंडन मॅक्युलम, शोएब मलिक, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी हा विक्रम नोंदवला आहे.

विराट कोहली

२) धोनी आणि आयपीएल -

या हंगामात चार सामने खेळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळलेला क्रिकेटपटू ठरेल. सध्या हा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाने आतापर्यंत १९३ आयपीएल सामने खेळले आहेत. यंदाच्या मोसमात रैनाने आयपीएलमधून माघार घेतली.

महेंद्रसिंह धोनी

३) ख्रिस गेल आणि १००० षटकार -

या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा शिलेदार ख्रिस गेलकडून मोठ्या विक्रमाची अपेक्षा आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तो १००० षटकार ठोकणारा फलंदाज ठरू शकतो. या हंगामात गेलने २२ षटकार ठोकले तर तो १००० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू असेल.

ख्रिस गेल

४) रवींद्र जडेजाला ७३ धावांची गरज -

चेन्नईचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजालाही आपल्या नावावर मोठा विक्रम करण्याची संधी आहे. या हंगामात त्याने ७३ धावा केल्या तर, आयपीएलमध्ये २००० धावा आणि १०० बळी घेणारा तो पहिला खेळाडू ठरेल.

रवींद्र जडेजा

५) बुमराहला खुणावतोय २०० बळींचा जादुई आकडा -

जसप्रीत बुमराह

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह १८ बळी घेताच टी-२० क्रिकेटमध्ये २०० बळी मिळवणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरेल.

२९ मार्चपासून आयपीएल स्पर्धा भारतात होणार होती. मात्र, कोरोनामुळेही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आता आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे.

Last Updated : Sep 18, 2020, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details