महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्चचषक स्पर्धेसाठी १५ एप्रिलला होणार टीम इंडियाची घोषणा - 15 April

कोणत्या क्रिकेटपटूंना संघात स्थान मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता

विश्चचषकसाठी १५ एप्रिलला होणार टीम इंडियाची घोषणा

By

Published : Apr 8, 2019, 12:31 PM IST

मुंबई - आयसीसीच्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा १५ एप्रिलला मुंबईत करण्यात येणार आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे.


जाहीर होणाऱ्या विश्वचषकासाठीचा संघात कोणत्या क्रिकेटपटूंना संघात स्थान मिळणार याबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. यापूर्वी २ एप्रिलला भारतीय क्रिकेट निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी २० एप्रिलपूर्वी विश्वचषकासाठीचा भारतीय संघ घोषित करण्यात येणापर असल्याची माहीती दिली होती.

विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना ३० मेला तर अंतिम सामना १४ जुलैला क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावार खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेट पंडितांनी भारत आणि यजमान संघ इंग्लंडला विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details