नाशिक -माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळी सेल्फी घेताना 250 फूट खोल दरीत कोसळले आहेत. गवळी हे आपल्या मित्रांबरोबर इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. तिथे एका कठड्यावर उभे राहून सेल्फी काढताना त्यांचा तोल गेला आणि ते दरीत कोसळले.
माजी रणजी क्रिकेटपटू सेल्फी घेताना कोसळला दरीत! - former ranji cricketer shekhar gavli news
शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. गवळी हे एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना 250 फूट दरीत कोसळले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर गवळी आणि त्यांचे काही मित्र इगतपुरी तालुक्यात असलेल्या मानस हॉटेल परिसरात पर्यटनासाठी गेले होते. गवळी हे एक उंच कठड्यावर उभे राहून सेल्फी घेत असताना 250 फूट दरीत कोसळले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. याबाबत आपत्कालीन यंत्रणेने गवळी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू संध्याकाळ झाल्याने त्यांचा शोध लागू शकला नसून उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.