मुंबई- मेलबर्न क्रिकेट क्लबने क्रिकेट चाहत्यांवर एक सर्वे केला होता. एकदिवसीय क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेट किती लोकप्रिय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा सर्वे करण्यात आला होता. या सर्वेतून आलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. सर्वेनुसार जवळपास ८६ टक्के चाहते एकदिवसीय क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटला पसंती देतात.
एकदिवसीय किंवा टी-२० नाही तर कसोटी क्रिकेटच सर्वात लोकप्रिय - सर्वे
सर्वेतून आलेली माहिती आश्चर्यचकीत करणारी आहे. सर्वेनुसार जवळपास ८६ टक्के चाहते एकदिवसीय क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटला पसंती देतात.
मेलबर्न क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) या सर्वेत १०० देशांतील १३ हजारपेक्षा जास्त चाहत्यांनी सहभाग घेतला होता. एमसीसीने जाहिर केले, की आम्ही केलेल्या सर्वेनुसार कसोटी क्रिकेटला चाहत्यांनी सगळ्यात जास्त पसंद केले आहे. ८६ टक्के लोकांनी कसोटीला प्राधान्य दिले आहे. आताही कसोटी प्रकाराला क्रिकेटचे सगळ्यात मोठे प्रारुप मानण्यात येत आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकारा प्रतिक्रिया देताना म्हणाला, या सर्वेचा निकाल ऐकून मी हैराण आहे. कसोटी क्रिकेटचे सगळ्यात चांगले भविष्य बनवण्याची हीच सगळ्यात चांगली संधी आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार माईक गटिंगनेही सर्वेच्या निकालावर आनंद व्यक्त केला.