मुंबई- दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आवडते दोन शिष्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री भारतीय क्रिकेट जगतमध्ये नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, मधल्या काही वर्षांमध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, सचिनने फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमीवर एक फोटो ट्विट करत 'ही दोस्ती तुटायची नाय' असा एकप्रकारे संदेश दिला आहे.
कांबळ्या...जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या, सचिनने फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमीवर केले ट्विट - vinod kambli
सचिन तेंडूलकरने काही तासांपूर्वी एक ट्विट केला असून त्याने विनोद कांबळीसोबतचा फोटो त्या ट्विटमध्ये जोडला आहे. त्या फोटोला त्याने 'कांबळ्या, शालेय दिवसातील हा फोटो मला मिळाला आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, म्हणून मी हा फोटो पुन्हा टाकतोय' असे मजेशीर कॅप्शनही दिले आहे.

दरम्यान, २००९ मध्ये विनोद कांबळी याने एका टीव्ही शोदरम्यान मला क्रिकेटमध्ये परत कमबॅक करण्यासाठी सचिनने मदत केली नसल्याचा गंभीर आरोप केला. यामुळे सचिन आणि कांबळी यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्यातील दुरावा कमी झाला आणि ते दोघे पुन्हा चांगले मित्र बनले. दरम्यान, फ्रेंडशीप डेच्या पार्श्वभूमिवर सचिनने केलेले ट्विट लोकांना खूपच आवडले असून लोक आवडीने त्या ट्विटवर रिट्विट करत आहेत.