मुंबई- आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी शुक्रवारी होणारी भारतीय संघाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबची माहिती बीसीसीआयने ट्विटर वरुन दिली आहे. संघ निवडीबाबत आज बैठक होणार नसून या बाबत निर्णय झाल्यानंतर माहिती देण्यात येईल, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड लांबणीवर - bcci meeting
संघ निवडीबाबत आज बैठक होणार नसून या बाबत निर्णय झाल्यानंतर माहीती देण्यात येईल असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
बीसीसीआय
कर्णधार विराट कोहलीला वेस्ट इंडीज दौऱ्यातून विश्रांती देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दौऱ्यासाठी कोहलीची निवड होण्याची शक्यता आहे. तसेच यष्टीरक्षक एम. एस. धोनीला वेस्ट इंडीज दौऱ्यातून वगळले जाणार असल्याची चर्चाही सुरू आहे. मात्र, याबाबत प्रथम धोनीशी चर्चा केली जाणार आहे, त्यानंतरच धोनी दौऱ्यासाठी येणार का नाही याबबात स्पष्टता होईल. खेळाडूंचा तंदुरुस्ती बाबतचा अहवाल येण्यास वेळ असल्याने बैठक पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे.
Last Updated : Jul 19, 2019, 3:21 PM IST