महाराष्ट्र

maharashtra

टीम इंडियाचं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वलस्थान बळकट

By

Published : Oct 6, 2019, 5:47 PM IST

आफ्रिकेविरुध्द विशाखापट्टणमच्या के राजशेखर रेड्डी मैदानावर रंगलेला सामना भारताने एकतर्फी २०३ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १६० गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड, तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा नंबर येते. अनुक्रमे हे संघ चौथ्या आणि पाचव्या स्थानावर विराजमान आहेत.

टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अव्वस्थानी कायम

विशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील, आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. तसेच भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान अधिक बळकट केले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यातील क्षण...

आफ्रिकेविरुध्द विशाखापट्टणमच्या के राजशेखर रेड्डी मैदानावर रंगलेला सामना भारताने एकतर्फी २०३ धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत १६० गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंड, तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा नंबर येते. अनुक्रमे हे संघ चौथ्या आणि पाचव्या स्थानावर विराजमान आहेत.

हेही वाचा -रोहित है तो मुमकिन है!.. 'या' विक्रमामध्ये रोहितच्या आसपासही कोणी नाही

भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यातील कसोटी मालिका २-० ने जिंकत, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला. ती विजयी लय भारताने दक्षिण आफ्रिका संघाविरुध्दही कायम राखली आहे.

भारतीय संघ गडी बाद केल्यानंतर आनंद साजरा करताना...

दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तीन कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. त्यात भारत विरुध्द वेस्ट इंडीज, श्रीलंका विरुध्द न्यूझीलंड आणि अॅशेसची इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा समावेश आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुध्दची मालिका २-० ने जिंकली. तर श्रीलंका विरुध्द न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोनही मालिका अनुक्रमे १-१ आणि २-२ ने बरोबरीत सुटल्या आहेत.

हेही वाचा -IND Vs SA : टीम इंडियाची आफ्रिकेवर २०३ धावांनी मात, शमीचा 'पंच' तर जडेजाचा 'चौकार'

ABOUT THE AUTHOR

...view details