हैदराबाद- भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २ मार्चपासून ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडिअमवर होणार आहे. दोन्ही संघ हैदराबादला पोहचले आहेत. भारतीय संघाचा नेट्समध्ये कसून सराव चालू आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी भारतीय खेळाडूंचा कसून सराव
मालिकेतील पहिला सामना हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडिअमवर होणार आहे. दोन्ही संघ हैदराबादला पोहचले आहेत. भारतीय संघाचा नेट्समध्ये कसून सराव चालू आहे.
२ सामन्यांच्या टी-ट्वेन्टी मालिकेत पराभव झाल्यानंतर ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजयाच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताचा पराभव झाला होता. तर, दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात मॅक्सवेलच्या शतकी खेळीने भारताचा पराभव झाला. आता ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ कसे प्रदर्शन करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर, केएल राहुल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल आणि रविंद्र जडेजा.