महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट', नटराजनने शेअर केला लेकीसोबतचा फोटो - नटराजनची मुलगी न्यूज

नटराजनने त्याची पत्नी पवित्रा आणि मुलगी हनविका यांच्यासोबतचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. तो फोटो शेअर करताना त्याने 'आमची छोटी परी हनविका' असे कॅप्शन दिले आहे.

t natarajan posts adorable photo with his daughter and wife
'तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट', नटराजनने शेअर केला लेकीसोबतचा फोटो

By

Published : Feb 23, 2021, 7:11 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याने शेअर केलेला एक फोटो सद्या चांगलाच व्हायरल होत आहे. नटराजनने त्याची पत्नी पवित्रा आणि मुलगी हनविका यांच्यासोबतचा एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. तो फोटो शेअर करताना त्याने 'आमची छोटी परी हनविका' असे कॅप्शन दिले आहे.

यूएईमध्ये आयपीएल खेळत असताना नटराजनच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. यानंतर नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली. ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून भारतात परतल्यानंतर टी नटराजनचे जंगी स्वागत करण्यात आले. तो सद्या आपल्या कुटुंबियासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.

नटराजनची मुलगी हनविका नुकतीच चार महिन्यांची झाली आहे. त्याने हनविका आणि पत्नीसोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट आहे. आमच्या आयुष्यात आनंद असण्यामागे तू कारण आहेस. पालक म्हणून आमची निवड केल्याबद्दल तुझे आभार लाडू. खूप सारं प्रेम, असे फोटो शेअर करताना नटराजनने म्हटलं आहे.

दरम्यान, आयपीएलमधील कामगिरीमुळे नटराजनची भारतीय संघात टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. टी-२० मधील पहिल्याच सामन्यात नटराजनने तीन विकेट्स घेतल्या होत्या. नंतर भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे नटराजनला एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.

हेही वाचा -IND vs ENG: डे-नाइट कसोटीत प्रथमच भारत आणि इंग्लंड आमने-सामने; गुलाबी चेंडूवर अग्निपरीक्षा

हेही वाचा -अ‌ॅडिलेडच्या खराब कामगिरीचा प्रभाव अहमदाबाद कसोटीत पडेल का?, विराटने दिलं 'हे' उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details