महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-ट्वेन्टीत विराट, धोनी नव्हे सुरेश रैनाचा लय भारी - रोहित शर्मा

रैनाने टी-ट्वेन्टीत ८ हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला आहे. डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने ३०० टी-ट्वेन्टी सामन्यात ३३.४७ च्या सरासरीने ८००१ धावा बनवल्या आहेत.

रैना १

By

Published : Feb 26, 2019, 9:32 AM IST

मुंबई- भारतीय संघातून दीर्घकाळासाठी बाहेर असलेल्या सुरेश रैनाने टी-ट्वेन्टीत नवीन विक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत रैनाने पुद्दुचेरी विरुद्ध केवळ १२ धावा केल्या असल्या तरी रैनाने टी-ट्वेन्टीत ८ हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला आहे.

डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने ३०० टी-ट्वेन्टी सामन्यात ३३.४७ च्या सरासरीने ८००१ धावा बनवल्या आहेत. भारतीय फलंदाजात धोनीनंतर केवळ रैनानेच ३०० टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. सुरेश रैना टी-ट्वेन्टीत सर्वाधिक धावा बनवण्याच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बाबतीत रैना पहिल्या क्रमांकावर आहे. रैनाने १७२ डावात ४९८५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर १ शतक आणि ३५ अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी रैनाला केवळ १५ धावा करायच्या आहेत.

टी-ट्वेन्टीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ख्रिस गेल - १२ हजार २९८ धावा

ब्रेंडन मॅक्कुलम - ९ हजार ९२२ धावा

कायरन पोलार्ड - ८ हजार ८३८ धावा

शोएब मलिक - ८ हजार ६०३ धावा

डेव्हिड वॉर्नर - ८ हजार १११ धावा

सुरेश रैना - ८ हजार ००१ धावा

ABOUT THE AUTHOR

...view details