मुंबई - भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाचा मृत्यू झाल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यामांवर व्हायरल झाली आहे. या बातमीमुळे सुरेश रैना चांगलाच हैराण झाला आहे. अशी खोटी बातमी पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुरेश रैनाने टि्वटद्वारे केली आहे.
मृत्यूच्या अफवेने सुरेश रैना हैराण, केली कारवाईची मागणी
सुरेश रैना गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममुळे संघाबाहेर पडला आहे. सध्या तो उत्तरप्रदेशच्या संघातून स्थानिक सामन्यात खेळत आहे.
रैना टि्वट करत म्हणाला की, माझ्या मृत्यूच्या अफवेच्या बातम्या पसरविल्या जात आहे. त्याने मी जाम वैतागलो आहे. या अशा सर्व प्रकारामुळे मला, कुटुंबाला आणि माझ्या मित्रांना नाहक त्रास होत आहे. मला काहीही झालेले नाही. मी सुखरुप आहे. ज्यांनी माझ्या मृत्यूची खोटी बातमी दाखवली आहे, त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचेही रैनाने सांगितले आहे.
सुरेश रैना गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममुळे संघाबाहेर पडला आहे. सध्या तो उत्तरप्रदेशच्या संघातून स्थानिक सामन्यात खेळत आहे. त्याने शेवटचा सामना मागील वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. भारतीय संघात एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू येत असल्याने सुरेश रैनाचे भारतीय संघात परतण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत.