मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनला एका कार्यक्रमाप्रसंगी तिचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे?, असे विचारण्यात आले. त्यावर सनी लियोनीने या प्रश्नाचे उत्तर देताना भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा तिचा आवडता क्रिकेटर असल्याचे सांगितले.
सनी लियोनीला आवडतो 'हा' भारतीय क्रिकेटपटू - झिवा
धोनी एक पारिवारिक व्यक्ती आहे, म्हणूनच तो मला आवडतो.
सनी लियोन म्हणाली, मला वाटते महेंद्रसिंह धोनी माझा आवडता क्रिकेटर आहे. धोनीकडे खुपच प्रेमळ बाळ आहे. मी धोनीचे आणि त्याच्या बाळाचे फोटो बघते, ते फोटो मला खूप आवडतात. धोनी एक पारिवारिक व्यक्ती आहे, म्हणूनच तो मला आवडतो.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जगभरात चाहते आहेत. याला बॉलिवूडही अपवाद नाही. कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी धोनीला आपला आवडता क्रिकेटर असल्याचे सांगितले आहे. साक्षीसोबत लग्न करण्याआधी धोनीचे अनेक बॉलीवूड अभिनेत्रीसोबत नाव घेतले जात होते.