महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

शमीचे 'फॅन' बनले गावस्कर, म्हणाले, शमीच्या गोलंदाजीमुळे मार्शलची आठवण येते - Mohammed Shami

वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना, गावस्कर यांना भारताचा तुमचा आवडता वेगवान गोलंदाज कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा गावस्कर यांनी मोहम्मद शमीचे नाव घेतले. शमीमुळे मला माल्कम मार्शलची आठवण होते. त्याच्याबाबत विचार केला तर मला आताही गाढ झोपेत जाग येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Sunil Gavaskar said Mohammed Shami reminds me of Malcolm Marshall
शमीचे 'फॅन' बनले गावस्कर, म्हणाले, शमीच्या गोलंदाजीमुळे मार्शलची आठवण येते

By

Published : Dec 23, 2019, 8:21 AM IST

कटक - भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी मोहम्मद शमीची तुलना वेस्ट इंडीजचा महान गोलंदाज माल्कन मार्शलशी केली आहे. त्यांनी शमीचे कौतूक करताना, शमीमुळे मला अनेकदा वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज माल्कन मार्शलची आठवण येते, असे गौरवोद्वार काढले.

मोहम्मद शमी

मोहम्मद शमी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेपासून चांगली कामगिरी करत आहे. त्याने या मोसमात वेग, स्विंग व उसळीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. यंदा तर तो २०१९ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ४२ बळींसह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना, गावस्कर यांना भारताचा तुमचा आवडता वेगवान गोलंदाज कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला.

गावस्कर यांनी तेव्हा मोहम्मद शमीचे नाव घेतले. शमीमुळे मला माल्कम मार्शलची आठवण होते. त्याच्याबाबत विचार केला तर मला आताही गाढ झोपेत जाग येते. असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, वेस्ट इंडीजच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मार्शलसोबत तुलना झाल्यामुळे निश्चितच भारताच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाचे मनोधैर्य उंचावणार आहे.

हेही वाचा -BBL 2019 : केकेआरने 'रिलीज' केलेल्या ख्रिस लिनने झोडपल्या इतक्या धावा

हेही वाचा -पाक फलंदाजांनी केली भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

ABOUT THE AUTHOR

...view details