महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 9, 2019, 7:21 PM IST

ETV Bharat / sports

'विराट आणि रोहितच्या भांडणाच्या बातम्यांना २० वर्षे अंत नाही'

भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी विराट आणि रोहितच्या वादाच्या प्रकरणाबद्दल मत मांडले आहे.

'विराट आणि रोहितच्या भांडणाच्या बातम्यांना २० वर्षे अंत नाही'

नवी दिल्ली -विंडीज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराटने रोहितसोबतच्या वादाला फेटाळून लावले होते. शिवाय, ड्रेसिंग रुममध्ये वातावरण कसे असते ते लोकांनी येऊन पाहावे, असेही तो म्हणाला होता. आता, भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनीही या वादाच्या प्रकरणाबद्दल मत मांडले आहे.

गावस्कर म्हणाले, 'विराट आणि रोहित छतावर उभे राहून ओरडले तरी, त्यांच्या भांडणाच्या बातम्या थांबणार नाहीत. पुढील २० वर्षे त्या तशाच चालू राहतील.' गावस्कर यांनी एका मॅगझिनमध्ये आपले मत मांडले. ते म्हणाले,'रोहित जर स्वस्तात बाद झाला तर, तो मुद्दाम बाद झाला असेही लोक म्हणतील.'

सुनील गावस्कर

गावस्कर यांनी मांध्यमांच्या भूमिकेविषयी मत व्यक्त केले. त्यांनी माध्यमांवर टीका करत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले, 'माध्यमांसाठी अशा बातम्या स्वर्गासारख्या असतात. जेव्हा क्रिकेट चालू असते तेव्हा अशा बातम्या बंद असतात आणि जेव्हा क्रिकेट बंद होते, तेव्हा या बातम्या चालू होतात.'

विराटने दिलेल्या रोहितसोबतच्या वादाला गावस्करांनीही तसेच उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, विराट आणि रोहित प्रोफेशनल क्रिकेटर आहेत. जेव्हा मैदानावर उतरतील तेव्हा ते विजयासाठी खेळतील.

ABOUT THE AUTHOR

...view details