सिडनी -कोरोना व्हायरसमुळे जगातील बऱ्याच देशामध्ये लॉकडाऊन लागू आहे. परंतु ऑस्ट्रेलियात हेच लॉकडाऊन थोडे शिथिल करण्यात आले आहे. लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे तेथील सरकारने सांगितले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील लोकांना बाहेर घराबाहेर पडता येते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथही फिटनेस कायम राखण्यासाठी घराबाहेर पडला आहे. या लॉकडाऊन काळात स्मिथने हाफ मॅरेथॉन पूर्ण केली आहे.
लॉकडाऊनमध्ये 21 किलोमीटर धावला स्टीव्ह स्मिथ!
ट्विटरवर स्मिथने ही माहिती दिली. तो म्हणाला, "काही लोकांनी मला गेल्या आठवड्यात सांगितले होते की 21 किलोमीटर ही हाफ मॅरेथॉन नसते. (मला ते माहित नव्हते) म्हणून मी 21.10 किमी धावलो आणि मी अधिकृतपणे हाफ मॅरेथॉन पूर्ण केली."

यापूर्वी गुरुवारी स्मिथने युवा क्रिकेटपटूंना फलंदाजीसंदर्भात काही टिप्स दिल्या होत्या. तो सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असतो.