महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

यॉर्करकिंग मलिंगा श्रीलंकेतून निवृत्त होऊन ऑस्ट्रेलियात जाणार

श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करुणरत्ने  याने मलिंगाच्या निवृत्तीबाबत खुलासा केला.

यॉर्करकिंग मलिंगा श्रीलंकेतून निवृत्त होऊन ऑस्ट्रेलियात जाणार

By

Published : Jul 23, 2019, 1:30 PM IST

कोलंबो -श्रीलंकेतचा वेगवान आणि यॉर्करकिंग अशी ओळख असेलेला लसिथ मलिंगा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. आगामी बांगलागदेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर मलिंगापर्वाचा अस्त होणार असून निवृत्तीनंतर तो ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार असल्याचे म्हटले जात आहे.

श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करुणरत्ने याने मलिंगाच्या निवृत्तीबाबत खुलासा केला. 'अनुभवी वेगवान गोलंदाज मलिंगा बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. त्यानंतर तो एकदिवसीय सामन्यांतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्याने निवड समितीला नेमके काय सांगितले हे माहित नाही, पण त्याने मला बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना असल्याचे कळवले आहे.' असे त्याने म्हटले आहे.

बांगलादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर येणार आहे. या संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार आहे. लसिथ मलिंगाने आपल्या करिअरमध्ये 225 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले असून 335 बळी घेतले आहे. वनडे सामन्यात 6-38 अशी उत्तम कामगिरी त्याने केली आहे. मलिंगा निवृत्तीनंतर, ऑस्ट्रेलियाचे कायमस्वरूपी नागरिकत्व घेणार असून त्याच्या कुटुंबासह तो तेथेच स्थायिक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details