लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने यजमान इंग्लडचा २० धावांनी पराभव केला. श्रीलंकेच्या या खळबळजनक विजयाने विश्वकरंडक स्पर्धेतच्या गुणातालिकेत फेरबदल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, इंग्लडला चालू शतकात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेचा एकदाही पराभव करता आलेला नाही. उभय दोन्ही संघात आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यामध्ये एकदाही श्रीलंकेचा पराभव झालेला नाही.
ICC WC २०१९: इंग्लडविरुध्द श्रीलंकेची 'अजिंक्य' परंपरा..वाचा इतिहास - srilanka
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने यजमान इंग्लडचा २० धावांनी पराभव केला. श्रीलंकेच्या या खळबळजनक विजयाने विश्वकरंडक स्पर्धेतच्या गुणातालिकेत फेरबदल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, इंग्लडला चालू शतकात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेचा एकदाही पराभव करता आलेला नाही.
श्रीलंका आणि इंग्लडच्या संघामध्ये २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील सामना झाला नाही. त्यानंतर २००७, २०११ आणि २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत लंकेने इंग्लडचा पराभव केला आहे. ४ एप्रिल २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेत नॉर्थ साऊंड येथे झालेल्या रंगतदार सामन्यात लंकेने इंग्लडचा अवघ्या २ धावांनी पराभव केला. तर २६ मार्च २०११ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत कोलंबो येथे झालेल्या सामन्यात लंकेने साहेबांचा १० बळी राखून पराभव केला. त्यानंतर १ मार्च २०१५ सालच्या स्पर्धेत वेलिंग्टन येथे लंकेने इंग्लडचा ९ बळी राखून पराभव केला.
आता २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत झालेल्या सामन्यात लंकेने इंग्लडचा २० धावांनी पराभव केला. दरम्यान, साहेबांना विश्वकरंडक सामन्यात एकदाही लंकेचा पराभव करता आला नाही. इंग्लडमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडस स्पर्धेमध्ये यजमान इंग्लडचा संघ विजयाचा दावेदार समजला जात आहे. असे असताना लंकेने नियोजनबध्द खेळ करत इंग्लडचा पराभव केला.