कोलंबो -श्रीलंका क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा सैन्यात दाखल झाला आहे. परेरा मेजर पदासाठी गाझाबा रेजिमेंटमध्ये दाखल झाला आहे. ३० वर्षीय परेराने ट्विटरवरुन या वृत्ताला दुजोरा दिला.
हेही वाचा -शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेची भारतावर बाजी
कमांडर लेफ्टनंट जनरल शिवेंद्र सिल्वा यांच्या निमंत्रणावरून श्रीलंका सैन्यात दाखल झाला असल्याचे परेराने म्हटले . कोलंबो गॅझेटच्या वृत्तानुसार, परेराला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात औपचारिकरित्या सामील करण्यात आले आहे. लंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडीमल देखील या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका सैन्य स्वयंसेवक दलात दाखल झाला होता. त्याने लष्कराच्या क्रिकेट संघाकडून खेळण्याची ऑफर स्वीकारली होती.
३० वर्षीय परेराने श्रीलंकेकडून ६ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ७९ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात २०३, वनडेमध्ये २२१० आणि टी-२० मध्ये ११६९ धावा केल्या आहेत. या तीन स्वरूपात परेराने अनुक्रमे ११, १७१ आणि ५१ विकेट्स घेतल्या आहेत.