केपटाऊन - आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आम्ही दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहोत, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटने बोर्डाने दिली आहे. कोरोनामुळे इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौर्यावरील एकदिवसीय मालिका रद्द झाली. त्यानंतर आगामी कसोटी मालिका श्रीलंकेत खेळवण्याची चर्चा रंगली होती. मात्र, तसे होऊ शकले नाही.
हेही वाचा -निवृत्तीनंतर पार्थिव पटेल करणार 'हे' काम
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) यांनी गुरुवारी निवेदनात म्हटले आहे , ''उभय संघात दोन कसोटी सामन्यांची मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होईल. सेंच्युरियन आणि जोहान्सबर्गमध्ये हे कसोटी सामने खेळले जातील. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग आहे."
दक्षिण आफ्रिकेसाठी ही महत्त्वपूर्ण मालिका आहे. कारण २४ गुणांसह विश्वचषक स्पर्धेत ते आठव्या स्थानावर आहेत. तर, ऑस्ट्रेलिया दुसर्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या संघात प्रशिक्षक मिकी आर्थरसह मानसिक आरोग्य तज्ज्ञही असतील.
दक्षिण आफ्रिका दौर्यावरील श्रीलंकेसाठी पहिली कसोटी सुपर स्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन येथे २६ ते ३० डिसेंबरदरम्यान खेळली जाईल. दोन्ही संघांमधील अंतिम कसोटी ३ ते ७ जानेवारीदरम्यान खेळली जाईल.