महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 5, 2019, 3:25 PM IST

ETV Bharat / sports

आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ परत एकदा चढला बोहल्यावर

स्मिथने रोमीसोबत त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला. '२ नोव्हेंबर हा अविश्वसनीय दिवस होता!!', असे स्मिथने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०११ मध्ये आयरिश गायक मॉर्गन डीन हिच्यासह स्मिथने लग्न केले होते.  स्मिथ आणि मॉर्गन यांना दोन मुलं आहेत. २०१५ मध्ये नात्यात दुरावा आल्यामुळे या दोघांनी घटस्फोट घेतला होता.

आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ग्रॅम स्मिथ परत एकदा चढला बोहल्यावर

नवी दिल्ली -दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज आणि कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने दुसरे लग्न केले आहे. स्मिथ आपली प्रेयसी रोमी लाफ्रान्चीसह बोहल्यावर चढला आहे. स्मिथने काही महिन्यांपूर्वीच आपल्या प्रेयसीशी साखरपुडा केला होता.

हेही वाचा -#HBD Virat: वाढदिवशी विराटने लिहिले स्वतःलाच प्रेरणादायी पत्र, वाचून तुमच्यातही संचारेल ऊर्जा

स्मिथने रोमीसोबत त्यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला. '२ नोव्हेंबर हा अविश्वसनीय दिवस होता!!', असे स्मिथने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०११ मध्ये आयरिश गायक मॉर्गन डीन हिच्यासह स्मिथने लग्न केले होते. स्मिथ आणि मॉर्गन यांना दोन मुलं आहेत. २०१५ मध्ये नात्यात दुरावा आल्यामुळे या दोघांनी घटस्फोट घेतला होता.

दक्षिण आफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार म्हणून स्मिथ ओळखला जातो. स्मिथने २०१४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आफ्रिकेसाठी त्याने ११७ कसोटी सामन्यात ९२६५ धावा केल्या आहेत. यात २७ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १९७ सामने खेळत ६९८९ धावा केल्या, तर टी-२० क्रिकेटमध्ये ३३ सामने खेळताना ९८२ धावा केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details