पोर्ट एलिझाबेथ - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्याकसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी २२२ धावांतच रोखले.
RSA VS SL: श्रीलंकेची घातक गोलंदाजी, पहिल्याच दिवशी आफ्रिकेचा संघ तंबूत - सर्वबाद
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवशी २२२ धावांतच रोखले. श्रीलंकेकडून सामन्यात विश्वा फर्नांडो आणि कसून रजिथा यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करताना आफ्रिकेला स्थिरावू दिले नाही. विश्वा फर्नांडोने चांगली गोलंदाजी करताना डीन एल्गर आणि हाशिम आमला यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. यानंतर, आफ्रिकेसाठी धक्का म्हणजे तेम्बा बवुमा हा धावबाद झाल्याने आफ्रिकेची स्थिती ३ बाद १५ धावा, अशी झाली होती. यानंतर, सलामीवीर एडन मार्करम ६० धावा, डि कॉक ८६ धावा यांच्या खेळीच्या बळावर आफ्रिकेने २२२ धावांपर्यंत मजल मारली.
श्रीलंकेकडून सामन्यात विश्वा फर्नांडो आणि कसून रजिथा यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर, धनंजय डिसिल्वाने २ गडी बाद करत त्यांना चांगली साथ दिली. श्रीलंकेन पहिल्या दिवसअखेर ३ गड्यांच्या मोबदल्यात ६० धावा केल्या आहेत. दुसऱया दिवशी चांगली फलंदाजी करून सामन्यात आघाडी घेण्याची संधी श्रीलंकेला असणार आहे.