महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'दादा' बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान - charge of bcci president

सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एकमताने उमेदवारी देण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय सचिवपदी तर, उत्तराखंडचे माहीम वर्मा हे नवीन उपाध्यक्ष असतील.

'दादा' बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान

By

Published : Oct 23, 2019, 1:14 PM IST

मुंबई -टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज अखेर बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. गांगुली हा बीसीसीयआयचा ३९ वा अध्यक्ष तर, अध्यक्षपद सांभाळणारा तो दुसरा कर्णधार ठरला आहे.

हेही वाचा -बलात्कारप्रकरणी रोनाल्डोचा पाय खोलात, २००९ चे होते प्रकरण

सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी एकमताने उमेदवारी देण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय सचिवपदी तर, उत्तराखंडचे माहीम वर्मा हे नवीन उपाध्यक्ष असतील.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. मात्र, गांगुलीच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. आयपीएलच्या चेअरमनपदी बृजेश पटेल यांना स्थान दिले गेले. तर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरूण धूमल यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सौरव गांगुली असल्याने जास्त आपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. तसेच त्याने प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोनही प्रकाराकडे लक्ष देणार असल्याचे गांगुलीने सांगितले आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पदावर राहू शकत नाही. त्यामुळे ४७ वर्षीय गांगुली फक्त एका वर्षासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहणार असून पुढच्या वर्षी तो 'कूलिंग ऑफ पीरियड' मध्ये जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details