महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सचिन-सौरव या दोन दिग्गजांची वानखेडेच्या मैदानावर झाली ग्रेट भेट ! - match

सचिन आणि गांगुली हात मिळवत असताना महेला जयवर्धनेच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्यकारक भाव होते. त्याचे फोटो मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहे.

सचिन-सौरव

By

Published : Mar 24, 2019, 9:32 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सलामीची ग्रेट जोडी आहे. निवृत्तीनंतर दोघांची मैदानावर भेट झाल्याचे दिसून आले नाही. मात्र, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाची भेट झाल्याचे दिसून आले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे.

सचिन आणि गांगुली हात मिळवत असताना महेला जयवर्धनेच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्यकारक भाव होते. त्याचे फोटो मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहे.

क्रिकेट विश्वावर या दोघांनी सलामी येऊन अधिराज्य गाजवत अनेक विक्रम प्रास्थापित केले. दोघांनी मिळून १७६ डावात ८२२७ धावा केल्या आहेत. त्यात २६ शतकीय भागीदारीचा समावेश आहे. सचिन आणि सौरवने भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले आहे.

आज सचिन हा मुंबईचा मेंटर आहे. गांगुलीदेखील दिल्लीच्या संघाचा सल्लागार म्हणून काम पाहतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details