महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट - सौरव गांगुली क्लीन चीट न्यूज

गांगुलीने राजीनामा दिला असून त्यानंतर त्यांच्याशी संबंधित हितसंबंधाचा कोणताही मुद्दा नाही, असे जैन यांना आढळून आले आहे. '२३ ऑक्टोबर २०१९ ला मी बंगालच्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ताबडतोब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता', असे गांगुलीने दालमिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

बीसीसीआयच्या 'बॉस'ला क्लीन चीट

By

Published : Nov 17, 2019, 5:46 PM IST

Updated : Nov 17, 2019, 7:47 PM IST

कोलकाता -भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली याला हितसंबंध प्रकरणात नितीन अधिकारी आणि लोकपाल डी. के. जैन यांच्याकडून क्लीन चिट मिळाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा (सीएबी) माजी अध्यक्ष गांगुलीने अभिषेक दालमिया यांना आपला राजीनामा सुपूर्त केला.

हेही वाचा -मैदानात शिवी दिल्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचे निलंबन

गांगुलीने राजीनामा दिला असून त्यानंतर त्यांच्याशी संबंधित हितसंबंधाचा कोणताही मुद्दा नाही, असे जैन यांना आढळून आले आहे. '२३ ऑक्टोबर २०१९ ला मी बंगालच्या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ताबडतोब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता', असे गांगुलीने दालमिया यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जैन यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, 'माझ्या दृष्टीने गांगुलीसंदर्भात कोणत्याही हितसंबंधाचा मानला जात नाही. म्हणूनच सध्याची तक्रार निकाली काढली जात आहे. या आदेशाच्या प्रती तक्रारदार, गांगुली आणि बीसीसीआयला पाठवण्यात आली आहे.'

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सभासद संजीव गुप्ता यांनी तक्रार दिली होती. 'बीसीसीआयच्या एजीएममध्ये ते कॅब अध्यक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक पदांवर कार्यरत आहेत', असा त्यांनी दावा केला होता.

Last Updated : Nov 17, 2019, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details