लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने संथ फलंदाजी केली. त्यामुळे धोनीवर सचिनसह अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणात आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही उडी टाकली आहे. गांगुलीने मात्र, याप्रकरणात धोनीचा बचाव केला आहे.
ICC WC २०१९ : सचिनच्या टीकेनंतर सौरव गांगुलीने केला धोनीचा बचाव - ICC WORLD CUP 2019
धोनी हा उच्च दर्जाचा फलंदाज आहे. अफगाणिस्तानविरुध्दच्या सामन्यानंतर तो पुन्हा विश्वकरंडक स्पर्धेतील उर्वरित सामन्यात चांगला खेळ करुन स्वतःला सिध्द करेल, असा विश्वास भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बोलून दाखवला. एका सामन्याने धोनीच्या प्रतिभेवर शंका घेण्यात येऊ नये, असेही गांगुली म्हणाला.
गांगुलीने एका वृत्तसंस्थेशी बोलताना, धोनीचा बचाव केला आहे. धोनी हा उच्च दर्जाचा फलंदाज आहे. अफगाणिस्तानविरुध्दच्या सामन्यानंतर तो पुन्हा विश्वकरंडक स्पर्धेतील उर्वरित सामन्यात चांगला खेळ करुन स्वतःला सिध्द करेल, असा विश्वास गांगुलीने बोलून दाखवला. एका सामन्याने धोनीच्या प्रतिभेवर शंका घेण्यात येऊ नये, असेही गांगुली म्हणाला.
अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने ५२ चेंडूत २८ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीवर सचिन तेंडूलकरसह अनेक खेळाडूंनी टीका केली होती. त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी सचिनलाही ट्रोल केले होते. दरम्यान, अफगाणिस्तान विरुध्दचा सामना भारताने ११ धावांनी जिंकला आहे.