मुंबई- भारत-पाकिस्तान विश्वकरंडक सामन्यावर मत मांडताना सचिन म्हणला होता, की १६ जूनला पाकिस्तानविरुद्ध न खेळणे आणि २ गुण देणे पाकिस्तानला मदत करण्यासारखे ठरेल, यामुळे व्देष वाढेल. यावर मत देताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे, की आगामी विश्वकरंडकात मला २ गुण नाही तर विश्वकरंडक पाहिजे.
सचिनला २ गुण पाहिजेत, मला तर विश्वकरंडक पाहिजे - सौरव गांगुली - क्रिकेट
सचिन म्हणला होता, की १६ जूनला पाकिस्तानविरुद्ध न खेळणे आणि २ गुण देणे पाकिस्तानला मदत करण्यासारखे ठरेल, यामुळे व्देष वाढेल.
सचिन तेंडुलकरने सुनिल गावस्करला समर्थन देताना म्हटले होते, की भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळले पाहिजे. पाकिस्तानला हरवून २ गुणांची कमाई केली पाहिजे. परंतु, हरभजन सिंग आणि सौरव गांगुली तेंडुलकरच्या या मताविरुद्ध आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्धचे क्रिकेटचे सर्व संबंध तोडून टाकले पाहिजेत, असे दोघांचे म्हणणे आहे.
सौरव गांगुली म्हणाला, विश्वकरंडकात १० संघ भाग घेणार आहेत. प्रत्येक संघाला एकमेकाविरुद्ध खेळायचे आहे. जर भारताने १ सामना खेळला नाही तर, खूप मोठा फरक पडणार नाही. गांगुलीच्या या वक्तव्याला जावेद मियादादने पब्लिक स्टंट म्हटले होते. यावर बोलताना गांगुली म्हणाला, मला मियादादच्या वक्तव्यावर कोणतेही प्रतिक्रिया द्यायची नाही. मला वाटते ते पाकिस्तानचे शानदार खेळाडू होते. मी त्यांच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे.