महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महाराष्ट्राचा 'वीर' यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार! - सिद्धेश वीर लेटेस्ट न्यूज

नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिव्यांशच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. येत्या १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा विश्वकरंडक खेळेल.

Siddhesh Veer to replace injured Divyansh Joshi in India squad for icc u 19 wc
महाराष्ट्राचा 'वीर' यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप खेळणार!

By

Published : Jan 11, 2020, 9:34 AM IST

मुंबई -दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या आयसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकासाठी भारतीय संघात महत्त्वाचा बदल झाला आहे. अष्टपैलू खेळाडू दिव्यांश जोशीच्या जागी महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा -मलेशिया मास्टर्स : सिंधुपाठोपाठ फुलराणीही स्पर्धेतून 'आऊट'!

नुकत्याच झालेल्या आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिव्यांशच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. येत्या १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा विश्वकरंडक खेळेल.

भारत हा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकाचा गतविजेता आहे. त्यामुळे यावर्षीच्या संघाकडून क्रिकेट चाहत्यांना आणि निवड समितीला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहेत.

जानेवारी २०२० मध्ये होणारा हा तेरावा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडक असून, दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्यांदा याचे आयोजन होत आहे. या स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघ सहभागी होणार आहेत. सोळा संघांचे चार गटांत विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील टॉपचे दोन संघ सुपर लीगसाठी खेळतील.

भारतीय संघ -

यशस्वी जयस्वाल (मुंबई), तिलक वर्मा (हैदराबाद), दिव्यांश सक्सेना (मुंबई), प्रियम गर्ग (कर्णधार- उत्तर प्रदेश), ध्रुव चंद जुरेल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक-उत्तर प्रदेश), शाश्वत रावत (बडोदा), सिद्धेश वीर (महाराष्ट्र), शुभांग हेगडे (कर्नाटक), रवी बिश्नोई (राजस्थान), आकाश सिंह (राजस्थान), कार्तिक त्यागी (उत्तर प्रदेश), अथर्व अंकोलेकर (मुंबई), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक-झारखंड), सुशांत मिश्रा (झारखंड), विद्याधर पाटील (कर्नाटक).

ABOUT THE AUTHOR

...view details