लाहोर -प्रेक्षकांशिवाय क्रिकेट हे नवरीशिवाय लग्न करण्यासारखे आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये मजा राहणार नाही आणि याचे मार्केटिंग करणे कठीण होईल, असे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. एका अॅपवर झालेल्या लाइव्ह सत्रात अख्तरने आपली भूमिका मांडली.
शोएब म्हणाला, "रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे व्यवहारी आणि टिकाऊ असू शकते. परंतु आपण त्याचे मार्केटिंग करू शकतो, असे मला वाटत नाही. रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे नवरीशिवाय लग्न करण्यासारखे आहे हा खेळ खेळण्यासाठी गर्दी आवश्यक आहे. कोरोनाची परिस्थिती एका वर्षात सामान्य होईल, अशी माझी अपेक्षा आहे."