लंडन -भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. धवन विश्वकरंडक स्पर्धेसाठी फिट नसून त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागणार असल्याने तो माघार घेत असल्यीची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
शिखर धवन विश्वकरंडकातून बाहेर, पंतची लागणार भारतीय संघात वर्णी - ICC
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती
लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आता पूर्ण विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
बीसीसीआयने यापूर्वीच धवनचा बॅकअप खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला बोलावून घेतले आहे. त्यामुळे धवनच्या जागेवर आता पंतची भारतीय संघात वर्णी लागणार आहे.