लंडन -विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे.
लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली होती. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आता विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.