नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोरोना व्हायरस हा सर्व विश्वचषकांपेक्षा मोठा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या महामारीला ‘मदर ऑफ ऑल वर्ल्डकप्स’ असे म्हटले. शास्त्रींनी लोकांना सरकारच्या आदेशांचे पालन करण्याची विनंतीही केली.
“हा सामान्य विश्वचषक नाही”, रवी शास्त्रींचा लोकांना खास संदेश
शास्त्रींनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. ते म्हणाले, “आज कोरोनाने आपल्याला मागे ढकलले आहे. या व्हायरसचा सामना करणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासारखे आहे. यासाठी काहीही करावे लागेल. हा सामान्य विश्वचषक नाही. हा सर्व विश्वचषकांचा जनक आहे. केवळ ११ खेळाडूच नव्हे तर १.४ अब्ज लोक त्याचा सामना करीत आहेत.”

शास्त्री म्हणाले, “मित्रांनो, आपण ही लढाई जिंकू शकतो. यासाठी आपल्याला मूलभूत पद्धती पहाव्या लागतील. आपल्याकडे पंतप्रधान आहेत जे या युद्धाचे नेतृत्व करत आहेत. या लढाईत योगदान देणाऱ्यांचा आदर केला पाहिजे. शिवाय, 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी घरीच राहून सोशल डिस्ट्न्स पाळावा.”