महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'अनस्टॅापेबल' शाकिब, या विश्वकरंडकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल - world cup

क्रिकेटमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकिबने शानदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावले स्पर्धेतील दुसरे शतक

'अनस्टॅापेबल' शाकिब, या विश्वकरंडकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडुंमध्ये अव्वल

By

Published : Jun 17, 2019, 10:21 PM IST

Updated : Jun 17, 2019, 11:19 PM IST

लंडन -आयसीसी विश्वकरंडकात २३व्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजचा ७ गडी राखून पराभव केला. धावांचा यशस्वी पाठलाग करताना सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकिब अल हसनने दमदार फलंदाजी करत १२४ धावांची शतकी खेळी केली. तसेच या सामन्यात त्याने वनडेमध्ये ६ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला असून अशी कामगिरी करणार तो दुसराच बांगलादेशी खेळाडू ठरला आहे.

शाकिब अल हसन

या विश्वकरंडकात बांगलादेशी टायगर्सना पहिला सामना वगळता उर्वरीत सामन्यात फारशी चमत दाखवता आली नाही. मात्र त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन या स्पर्धेत खोऱ्याने धावा करताना दिसतोय. शाकिबने आतापर्यंत ४ सामने खेळताना २ शतके आणि २ अर्धशतकांच्या ३८४ धावा केल्या आहेत. तसेच तो यंदाच्या विश्वकरंडकात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये फिंचला मागे सारत अव्वलस्थानी पोहचला आहे. त्याची या विश्वकरंडकात धावांची भूक पाहता त्याला 'अनस्टॅापेबल शाकिब अल हसन' असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

विश्वकरंडकात दक्षिण आफ्रिकेवर धक्कादायक विजय मिळवत धमाकेदार सरुवात करणाऱ्या बांगलादेशला त्यानंतरच्या झालेल्या दोन्ही सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. तर श्रीलंकेविरुद्धचा चौथा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

Last Updated : Jun 17, 2019, 11:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details