महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पुलवामा हल्ला : हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार विरेंद्र सेहवाग

दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघानेदेखील विजयानंतर मिळालेली बक्षीसाची रक्कम पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचे जाहीर केले आहे.

विरेंद्र सेहवाग

By

Published : Feb 16, 2019, 11:01 PM IST

नवी दिल्ली - जम्मूकाश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी बुधवारी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएच्या ४२ जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर समाजातील प्रत्येक जण आपापल्यापरीने हुतात्मा जवानांच्या परिवारास मदत करत आहे. त्या प्रमाणे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. वीरमरण आलेल्या जवानांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणार असल्याची माहिती त्याने ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.
सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, वीरमरण आलेल्या जवानांसाठी आपण जेवढे करू तेवढे कमीच आहे. पण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी आपण घेऊ शकतो. आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये जर शहीद जवांनाच्या मुलांनी प्रवेश घेतला तर ते माझे सौभाग्य असेल, असेही तो म्हणाला आहे.

दरम्यान, सलग दुसऱ्या वर्षी रणजीपाठोपाठ इराणी करंडक जिंकणाऱ्या विदर्भाच्या संघानेदेखील विजयानंतर मिळालेली बक्षीसाची रक्कम पुलवामा येथे वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचे जाहीर केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details