लाहोर -पाकिस्तानच्या सहा क्रिकेटपटूंचा दुसरा गट शुक्रवारी इंग्लंडला रवाना होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बुधवारी ही माहिती दिली. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सद्वारे फखर जामन, मोहम्मद हसनैन, मोहम्मद हाफिज, मोहम्मद रिजवान, शादाब खान आणि वहाब रियाज इंग्लंडला रवाना होतील.
या सर्व खेळाडूंसाठी दुसरी कोरोना चाचणी 29 जूनला घेण्यात आली. यात हे खेळाडू निगेटिव्ह आढळले. मँचेस्टरमध्ये पोहोचल्यानंतर हे सहा खेळाडू वॉर्सेस्टरला जातील. तेथे त्यांची इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ईसीबी) चाचणी घेतली जाईल.