राजकोट - शहरातील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बंगाल आणि सौराष्ट्र या संघांमध्ये रणजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यातएवी बरोट (५४) आणि विश्वराज जडेजा (५४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सौराष्ट्रने पहिल्या दिवशी ५ गड्यांच्या मोबदल्यात २०६ धावा केल्या आहेत. सामन्यात नाणेफेक जिंकून सौराष्ट्रने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा -माहीची अग्निपरीक्षा..! भारतीय संघात पुनरागमनासाठी धोनीपुढे बीसीसीआयने ठेवली 'ही' अट
सौराष्ट्रकडून फलंदाजीला मैदानात आलेल्या हार्विक देसाई आणि बरोट या सलामीवीरांनी ८२ धावांची भागीदारी रचली. शाहबाज अहमदने देसाई झेलबाद केले. देसाईने १११ चेंडूंचा सामना करत पाच चौकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर बरोटही सहा चौकारांसह माघारी परतला.
त्यानंतर विश्वराज जडेजा, शेल्डन जॅक्सनही काही धावांच्या अंतरावर बाद झाले. भारतीय कसोटी संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला दुखापतीमुळे ५ धावांवर मैदान सोडावे लागले. चेतन सकारियाला बाद केल्यानंतर, खेळ थांबवण्यात आला. सौराष्ट्रकडून अर्पित देसाई २९ धावांवर नाबाद राहिला आहे. बंगालकडून आकाश दीपने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर, इशान पोरेल आणि शाहबाज अहमदला प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.