मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुध्द पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३३७ धावांचं आव्हान दिले आहे. भारताच्या फलंदाजांनी अमिर वगळता पाकिस्ताच्या सगळ्याच गोलंदाजांची 'पिसे' काढली. दरम्यान, भारतीय फलंदाज आपल्या गोलंदाजांना 'चोप' देत असताना पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद मात्र, भर मैदानात जांभई देत होता.
WC २०१९ : पाक गोलंदाजांची 'धुलाई' पाहून कर्णधार सर्फराज भरमैदानातच देत होता 'जांभई'
भारतीय फलंदाज आपल्या गोलंदाजांना 'चोप' देत असताना पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद मात्र, भर मैदानात जांभई देत होता.
भारत विरुध्द पाकिस्तान या संघातील सामना हा जणू युध्दाप्रमाणे खेळला जातो. दोन्ही संघ विजयासाठी प्राणपणाला लावतात. मात्र, आजच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरश चोप देत ३३६ धावांचा डोंगर उभा केला. एकीकडे आपल्या गोलंदाजाची धुलाई होत होती. तर दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार भरमैदानात जांभई देत होता.
सर्फराजने एकदा नव्हे तर अनेक वेळा जांभई दिली. यामुळे सद्या सोशल मीडियावर पाक कर्णधाराला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.