महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'तुम्ही आता बुमराहला शिकवणार का मांजरेकर?' - संजय मांजरेकर लेटेस्ट न्यूज

समालोचक संजय मांजरेकरांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्विटरवरून एक सल्ला दिला. या ट्विटमुळे नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

sanjay Manjrekar trolled for advising Bumrah
'तुम्ही आता बुमराहला शिकवणार का मांजरेकर?'

By

Published : Feb 1, 2020, 9:41 AM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मांजरेकरांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्विटरवरून एक सल्ला दिला. या ट्विटमुळे नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे.

हेही वाचा -‘बीसीसीआय’ची क्रिकेट सल्लागार समिती जाहीर

न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. भारताकडून जसप्रीत बुमराहने या षटकात १७ धावा दिल्या होत्या. या धावांमुळे मांजरेकरांनी बुमराहबद्दल ट्विट केले. 'बुमराहने टाकलेली सुपर ओव्हर पाहिली. तो एक उत्तम गोलंदाज आहे, परंतु वेगळ्या कोनातून तयार करण्यासाठी तो क्रीझचा अधिक उपयोग करू शकतो', असा सल्ला मांजरेकरांनी दिला.

मांजरेकरांच्या या ट्विटला नेटिझन्सनी उत्तरे दिली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details