हैदराबाद - पाकिस्तान झिंदाबाद अशी पोस्ट टाकणारा क्रिकेटपटू शोएब मलिकविरुद्ध देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशातील काही प्रमुख पक्षाचे नेते, आमदार आणि नेटिझन्सने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
बीजेपीचे आमदार राजा सिंह यांनी सानिया मिर्झा हिला तेलंगाणाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदावरुन काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. हे टि्वट शोएबला चांगलेच महागात पडत आहे.
सिंह पुढे म्हणाले, की संपूर्ण देश पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात आहे. तरीही ब्रँड अॅम्बेसेडरचा पती पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत आहे. हे कदापी सहन केले जाणार नाही. तेलंगणाच्या ब्रॅड अॅम्बेसेडरपदी सायना नेहवाल आणि पीवी सिंधू यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या शोएब मलिकविरुद्ध देशात संतापाची लाट
बीजेपीचे आमदार राजा सिंह यांनी सानिया मिर्झा हिला तेलंगाणाच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदावरुन काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडे केली आहे. हे टि्वट शोएबला चांगलेच महागात पडत आहे.
दुसरीकडे टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी शोएब मलिक यांना भारतात प्रवेश बंदी घालण्याची मागणी केली आहे. नेटिझन्सनी तर मलिक भारतात आला त्याच्या हल्ला करण्याच्या धमक्या देत आहेत.
पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर सानिया मिर्झाने प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. याबाबत सानिया प्रतिक्रिया देताना म्हणाली की, प्रत्येक गोष्टीवर सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही. मी नेहमीच दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आहे हे सिध्द करण्यासाठी मला सोशल मीडियावर मत व्यक्त करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया सानियाने दिली.