महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सचिन म्हणतो....धोनीने ‘या’ क्रमांकावर खेळल्यास विश्वकरंडक स्पर्धेत भारताला होईल फायदा

चर्चेत असलेल्या चौथ्या क्रमांकासाठीच्या स्थानावर कोणता फलंदाज खेळेल हे माहीत नसल्याचे सचिनने म्हटले आहे

सचिन म्हणतो....धोनीने ‘या’ क्रमांकावर खेळल्यास विश्वकरंडक स्पर्धेत भारताला होईल फायदा

By

Published : May 24, 2019, 9:09 PM IST

नवी दिल्ली - एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी अवघे काहीच दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या मते विश्वचषक स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी महेंद्रसिंग धोनी हाच योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र चर्चेत असलेल्या चौथ्या क्रमांकासाठीच्या स्थानावर कोणता फलंदाज खेळेल हे माहीत नसल्याचे सचिनने म्हटले आहे.

धोनी

पाचव्या क्रमांकासाठी कोणता फलंदाज योग्य राहील यावर बोलताना सचिन म्हणाला, की ' भारताच्या पहिल्या ४ फलंदाजांवर मोठी मदार असले. तर त्या पुढिल फलंदाजांना फिनिशरची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे पाचव्या क्रमांकाची जबाबदारी मोठी असून, धोनी त्या जागेनर योग्य आहे. धोनी हा एक अनुभवी आणि वेळेप्रसंगी वादळी खेळी करण्यास सक्षम आहे. सामन्याच्या अखेरपर्यंत तो आपल्या खेळीच्या जोरावर भारताचा धावफलक हालता ठेवण्याची जबाबदारी चोख पार पाडू शकतो.’

इंग्लंडमध्ये ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यात भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

ABOUT THE AUTHOR

...view details