महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सचिन तेंडुलकर : पदार्पणानंतर ५ वर्षांनी ठोकले पहिले शतक

सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध १९८९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी आजच्याच दिवशी १९९४ साली सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. १९९४ साली श्रीलंकेत झालेल्या सिंगर वर्ल्ड सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सचिनने ११० धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार २ षटकार लगावले.

सचिन तेंडूलकर : पदार्पणानंतर ५ वर्षांनी ठोकले पहिले शतक

By

Published : Sep 9, 2019, 7:40 PM IST

Updated : Sep 17, 2019, 8:36 PM IST

मुंबई - क्रिकेट विश्वात धावांच्या राशी उभारणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनने त्याच्या कारकिर्दीत शतकांचे शतक केले आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. अशा अनेक विक्रमांचा 'बादशाह' असलेल्या सचिनला पहिले एकदिवसीय शतक ठोकण्यासाठी तब्बल ५ वर्षांचा कालावधी लागला. होय हे खरे आहे.

हेही वाचा -Cricket Record : एकदिवसीय इतिहासात टीम इंडियाने उभारलेली 'टॉप ५' सर्वोच्च धावसंख्या

सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध १९८९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी आजच्याच दिवशी १९९४ साली सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. १९९४ साली श्रीलंकेत झालेल्या सिंगर वर्ल्ड सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सचिनने ११० धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार २ षटकार लगावले.

हेही वाचा -बुमराह मैदानावर जादू घडवू शकतो, आफ्रिकन गोलंदाजाने केली स्तुती

सचिनच्या ११० धावांच्या जोरावर भारताने निर्धारीत ५० षटकात २४६ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नव्हता, त्यांचा डाव २१५ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकला. सचिनला शतकी खेळीमुळे या लढतीत सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

Last Updated : Sep 17, 2019, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details