मुंबई - भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने खेळाशी संबंधित दुखापतींवर वेबिनारमध्ये भाग घेतला होता. या वेबिनारमध्ये त्याने देशभरातील तरुण डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले अनुभव शेअर केले. लॉकडाऊन दरम्यान देशभरातील अनेक तरुण फिजीशियन क्रीडा-संबंधित दुखापतींवर आपली माहिती एकमेकांना सांगत असल्याचे सचिनला ऑर्थोपेडिक डॉक्टर सुधीर वॉरियर यांच्याकडून कळले.
तब्बल १२ हजार डॉक्टरांशी सचिनने साधला संवाद
खेळातील दुखापतींविषयी शनिवारी एक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचा सचिनदेखील एक भाग होता. यावेळी सचिनने देशभरातील सुमारे १२ हजार डॉक्टरांशी संवाद साधला. सेवांसाठी मी वैद्यकीय समुदायाचा आभारी आहे. हा कार्यक्रम तरूण डॉक्टरांना शिकण्यास मदत करेल, अशी प्रतिक्रिया सचिनने या सत्रादरम्यान दिली.
6764682
खेळातील दुखापतींविषयी शनिवारी एक सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राचा सचिनदेखील एक भाग होता. यावेळी सचिनने देशभरातील सुमारे १२ हजार डॉक्टरांशी संवाद साधला. सेवांसाठी मी वैद्यकीय समुदायाचा आभारी आहे. हा कार्यक्रम तरुण डॉक्टरांना शिकण्यास मदत करेल, अशी प्रतिक्रिया सचिनने या सत्रादरम्यान दिली.
डॉ. सुधीर वारियर यांनी भारतीय क्रिकेट टीमचे फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांच्याशी संवाद साधला. पटेल यांन यापूर्वी आयपीएल टीम मुंबई इंडियन्सबरोबर काम केले आहे.