लंडन -भारताचा दिग्गज माजी फलंदाज आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱया सचिन तेंडुलकरचा यावर्षीच्या आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. सचिनबरोबर दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलेन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महान महिला क्रिकेटपटू कॅथरिन फिट्झपॅट्रिक यांचाही ऑल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.
'हॉल ऑफ फेम' मिळवणाऱ्या क्रिकेटच्या देवाकडून निघाले 'हे' उद्गार... - cricket
भारताच्या या विक्रमादित्याला गुरुवारी आयोजित केलेल्या आयसीसीच्या एका सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला.
'हॉल ऑफ फेम' मिळवणाऱ्या क्रिकेटच्या देवाकडून निघाले 'हे' उद्गार...
भारताच्या या विक्रमादित्याला गुरुवारी आयोजित केलेल्या आयसीसीच्या एका सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला. यावेळी मास्टर ब्लास्टरने 'माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे' असे उद्रार काढले आहेत. त्याचबरोबर त्याने त्याच्या सर्व कर्णधारांचे बीसीसीआय, एमसीएचेही आभार मानले. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे. यापूर्वी बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना हा सन्मान मिळाला आहे.
- २००९ - बिशन सिंग बेदी
- २००९ - सुनील गावसकर
- २०१० - कपिल देव
- २०१५ - अनिल कुंबळे
- २०१८ - राहुल द्रविड
- २०१९ - सचिन तेंडुलकर