महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

तब्बल १४ वर्षांनंतर आफ्रिकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा! - pakistan cricket team

ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. उभय संघांत दुसरी कसोटी रावळपिंडी येथे ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर टी-२० मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेचे तिन्ही सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळले जातील.

SA to tour Pakistan first time in 14 years for two Tests and three T20Is
तब्बल १४ वर्षांनतर आफ्रिकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा!

By

Published : Dec 9, 2020, 5:05 PM IST

जोहान्सबर्ग -दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये दोन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौरा करणार आहे. २००७ नंतर प्रथमच आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौर्‍यावर जाणार आहे. एका अहवालानुसार, दक्षिण आफ्रिका १६ जानेवारीला कराची येथे पोहोचणार आहे. २६ जानेवारीपासून नॅशनल स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याआधी हा संघ क्वारंटाइन होईल.

बाबर आझम

हेही वाचा -टीम इंडियाला पराभवासोबत जबर धक्का!

ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. उभय संघांत दुसरी कसोटी रावळपिंडी येथे ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यानंतर टी-२० मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेचे तिन्ही सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळले जातील.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथ म्हणाला, "बरेच देश पाकिस्तानमध्ये परतले असल्याचे पाहून मला समाधान वाटले. दक्षिण आफ्रिकेचा संघ या देशांमध्ये असल्याने मला आनंद झाला. मी एकापेक्षा जास्त वेळा पाकिस्तानमध्ये गेलो आहे. पाकिस्तानमधील लोक क्रिकेटसाठी उत्साही असल्याचे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.''

या मालिकेसंदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) संचालक झाकीर खान म्हणाले की, पाकिस्तानने श्रीलंका, बांगलादेश, मेरीलेबोन क्रिकेट क्लब तसेच पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन केले आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या सुरक्षेसाठी आम्ही कसलीही कसर सोडणार नाही, जेणेकरुन दोन्ही संघांचे खेळाडू कसोटी आणि टी-२० सामन्यांत सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळू शकतील. शिवाय, ते त्यांच्या खेळाद्वारे संपूर्ण जगाचे मनोरंजन करू शकतील.

तीन टी-२० सामन्यांची मालिका ११, १३आणि १४ फेब्रुवारी रोजी खेळली जाईल.

ABOUT THE AUTHOR

...view details