ढाका - एकीकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर शास्त्री यांना कायम ठेवण्यात आले. तर, दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही संघाच्या नवीन प्रशिक्षकाची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी प्रशिक्षक रसेल डोमिंगो हे बांगलादेशचे नवीन मुख्य प्रशिक्षक असतील.
टीम इंडियासोबत बांगलादेशनेही निवडला आपला नवीन कोच
बोर्डाने आज शनिवारी डोमिंगो यांच्या नियुक्तीची घोषणा केली. बीसीबीचे अध्यक्ष नजमूल हसन यांनी डोमिंगो यांच्या निवडीविषयी माहिती दिली.
बोर्डाने आज शनिवारी डोमिंगो यांच्या नियुक्तीची घोषणा केली. बीसीबीचे अध्यक्ष नजमूल हसन यांनी डोमिंगो यांच्या निवडीविषयी माहिती दिली. डोमिंगो २१ ऑगस्टपासून आपल्या नव्या पदावर रुजू होतील. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे.
४४ वर्षीय डोमिंगो यांनी याआधी दक्षिण आफ्रिकेच्या अंडर -१९ आणि वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकाचे काम पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आफ्रिकेचा संघ २०१४ च्या आयसीसी टी-२० आणि २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.