महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्मा बनला नवा 'सिक्सर किंग', गेलला टाकले मागे

ख्रिस गेलने ५८ सामन्यात १०५ षटकार ठोकले असून रोहित शर्माने गेलला मागे टाकले आहे. रोहितने ९६ टी-२० सामन्यात खेळताना १०५ षटकारांचा आकडा पार केला आहे.

रोहित शर्मा बनला नवा 'सिक्सर किंग', गेलला टाकले मागे

By

Published : Aug 4, 2019, 9:40 PM IST

फ्लोरिडा - भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. रोहितने वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळताना व्यक्तिगत दुसरा षटकार लगावला आणि विंडिजच्याच ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत 'सिक्सर किंग' बनला.

ख्रिस गेलने ५८ सामन्यात १०५ षटकार ठोकले असून रोहित शर्माने गेलला मागे टाकले आहे. रोहितने ९६ टी-२० सामन्यात खेळताना १०५ षटकाराचा आकडा पार केला आहे.

रोहित शर्मा आणि गेल नंतर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टीलने १०० सामन्यात १०३ षटकार लगावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details