महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी-20 वर्ल्डकप की आयपीएल?....वाचा रोहितने दिलेले उत्तर

टी-20 विश्वकरंडक स्पर्धा किंवा आयपीएल यापैकी काय खेळायला आवडेल? यावर रोहितने 'दोन्ही' असे उत्तर दिले. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. परंतु कोरोनाव्हायरसमुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे.

rohit sharma wants to play both t20 world cup and ipl
टी-20 वर्ल्डकप की आयपीएल?....वाचा रोहितने दिलेले उत्तर

By

Published : Jun 14, 2020, 7:44 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आणि आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवरील झालेल्या संवादात रोहितने आपली प्रतिक्रिया दिली.

टी-20 विश्वकरंडक स्पर्धा किंवा आयपीएल यापैकी काय खेळायला आवडेल? यावर रोहितने 'दोन्ही' असे उत्तर दिले. यावर्षी 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. परंतु कोरोना व्हायरसमुळे या स्पर्धेवर टांगती तलवार आहे.

या स्पर्धेनंतर, भारताला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर कसोटी मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी गाबा येथे खेळली जाईल. यानंतर, उर्वरित तीन सामने अ‌ॅडलेड ओव्हल, एमसीजी आणि एससीजी येथे खेळले जातील.

ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्याच्या प्रश्नावर रोहित "हे निश्चितच एक आव्हान असेल", असे उत्तर दिले. ''स्टीव्ह स्मिथ आणि जेसन रॉय यांना फलंदाजी करताना पाहणे मला आवडते'', असे रोहित म्हणाला.

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे एका शब्दात वर्णन करण्यास सांगितले असताना. रोहितला त्याला 'दिग्गज' म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details