मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.५ एप्रिल) रात्री नऊ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेची उपकरणे बंद करा आणि दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅश ऑन करा, असे आवाहन देशवाशियांना केले आहे. त्यांच्या या आवाहनाला भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने पाठिंबा देत लोकांना याबाबत आवाहन केले आहे.
रोहितने यासंदर्भात ट्विट करत सांगितले की, 'आपल्याला हा आयुष्याचा कसोटी सामना सर्वांना जिंकायचा आहे. त्यासाठी आपण किती कणखर आहोत, आपल्यामध्ये किती एकजूटता आहे आणि आपण सर्व मिळून या गोष्टीचा सामना कसा करत आहोत, हे आज ९ वाजता दिवे लावून दाखवून द्या.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता एक व्हिडिओ संदेशाद्वारे आवाहन केलं की, 'कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा.